Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara : शेळ्यांसाठी चारा आणायला गेला अन् खड्ड्यात बुडाला; तरुणाचा मृत्यू

Bhandara News : शेळी पालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना शेळ्यांसाठी रोज चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला असून या घटनेने परिवारावर मोठे संकट उभे राहिले आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: मच्छेरा गावाच्या हद्दीत शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेला असता या परिसरात खोदण्यात आलेल्या कृत्रिम खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर तरुणाच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. 

भंडारा जिल्ह्यातील मच्छेरा गावातील विशाल वासुदेव धावडे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान विशाल हा शेळी पालनाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शेळ्यांना चारा लागत असल्याने विशाल हा रोज चारा आणण्यासाठी जात असे. त्यानुसार तो गावाच्या शिवारात चारा आणण्यासाठी गेला होता. यातच सिहोरा गावाच्या शेजारी असणाऱ्या मच्छेरा गावाच्या हद्दीत डांबर प्लांट लावण्यात आला आहे. या प्लांटच्याजवळ कृत्रिम खड्डा खोदण्यात आला आहे. 

खड्डा न दिसल्याने पडला पाण्यात 

खोदण्यात आलेल्या कृत्रिम खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. दरम्यान विशाल हा शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी या परिसरात गेला होता. त्याला खड्ड्याचा अंदाज आला नाही. यामुळे तो थेट खड्ड्यात पडला. खड्ड्यात गाळ असल्याने त्यातून त्याला बाहेर निघता आले नाही. यात त्याचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी गावात माहिती मिळताच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. 

कुटुंबीयांचा आक्रोश 

तर घटनेची माहिती सिहोरा पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक विजय कसोधन व त्यांच्या चमूने यांनी घटनास्थळ गाठले. गावकऱ्यांच्या मदतीने विशालचा मृतदेह खोल खड्यातून बाहेर काढण्यात आला. उपजिल्हा तुमसर रुग्णालयात मृत विशालच्या करण्यात शवविच्छेदन आले. सिहोरा पोलिसांनी नोंद करत तपास सुरू केला आहे. तपास पोलिस कर्मचारी इळपाते करीत आहेत. विशालच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात शोककळा पसरली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT