Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा लॉजमध्येच मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर

Bhandara News प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा लॉजमध्ये मृत्यू

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : प्रियकर प्रेयसी फिरायला गेले. खरेदी झाल्यानंतर दोघे लॉजवर थांबले. परंतु तरुणीसोबत लॉजमध्ये गेलेल्या तरुणाचा रात्री अचानक (Death) मृत्यू झाला. ही घटना (Bhandara) भंडारा शहरातील हिरणवार लॉजमध्ये घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. (Tajya Batmya)

आजच्या तरुण तरुणाईमध्ये डेट करण्याचा प्रमाणत हल्लीच्या काळात वाढत आहे. घरून मित्र केव्हा मैत्रिणीकडे जातो म्हणून आजकालची मुले फिरायला जातात. असाच काहीसा प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला असून तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. क्रिष्णा रायभान धनजोडे (वय २३ रा. केशोरी जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे. क्रिष्णाचे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जरफडा येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. 

रात्री झोपला तो उठलाच नाही  

दोघेही २० ऑगस्टला भेटण्याकरिता भंडाऱ्याला आले. पर्यटनस्थळे फिरून शहरात सामान खरेदी करून त्यांनी जेवण केले. त्यानंतर शहरातील एका लॉजवर मुक्कामी थांबले. तरुणांने शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या होत्या. रात्री दोघेही झोपी गेले. पण मध्यरात्री तरुणी झोपेतून उठली असता तिने क्रिष्णाला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो काहीच हालचाल केली नाही. यामुळे मुलगी घाबरली व लॉजमधील कर्मचाऱ्यांना आवाज दिला. सगळ्यानी मिळून भंडारा येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण या आधीच क्रिष्णाचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT