Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : रेल्वेसमोर उडी घेत युवकाने संपविले जीवन; देव्हाडी- तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील घटना

Bhandara : तुमसर रोड रेल्वे स्थानका समोर येथील रेल्वे कर्मचारी कर्तव्यावर असताना सदर युवक रेल्वेच्या गाडीच्या समोर येऊन आत्महत्या केल्याची घटनेची माहिती रेल्वे पोलीसांना देण्यात आली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: तुमसर तालुक्यातील देव्हाडी तुमसर रोड रेल्वे स्थानकासमोर काही अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावर अहमदाबाद- पुरी एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या समोर येऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान हि घटना सकाळी घडली असून युवकाने आत्महत्या कोणत्या कारणाने केली याचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. 

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यामधील बहेवाडा येथील संदिप बळीराम रोडगे (वय ३९) असे आत्महत्या करणाऱ्या युतकाचे नाव आहे. तुमसर रोड रेल्वे स्थानका समोर येथील रेल्वे कर्मचारी कर्तव्यावर असताना सदर युवक रेल्वेच्या गाडीच्या समोर येऊन आत्महत्या केल्याची घटनेची माहिती रेल्वे पोलीसांना देण्यात आली. दरम्यान रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचानामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पोलिसांकडून पंचनामा करत तपास सुरु 

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मृत संदीप रोडगे या युवकाच्या हातावर एस नाव लिहले आहे. तर अंगात काळ्या रंगाचा टि शर्ट व निळ्या रंगाचा जिन्स पॅन्ट घातलेली आहे. सदर घटनेची नोंद देव्हाडी पोलिसात करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

देव्हाडी- तुमसर रोड रेल्वे स्थानकावर सकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र सदर युवकाने टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनेची माहिती मृत युवकाच्या कुटुंबियांना कळविली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरु असून यातून आत्महत्येचे कारण समोर येऊ शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT