Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : अंगावर घराची भिंत कोसळून तरुणाचा मृत्यू; करांडला येथील घटना

Bhandara News : शेती काम करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतीचे काम सुरु आहे. त्यामुळे घटनेच्या दिवशी योगेश देशमुख हा सकाळी शेतात गेला होता.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: शेतातून काम करून घरी आलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतातून आल्यानंतर थोडा वेळ आराम करून स्वतःच्याच जुन्याजवळ काही काम करण्यासाठी गेला असताना त्या घराची भिंत अचानक कोसळली. या भिंतीखाली दबला गेल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील करांड या गावात घडली आहे. 

सदरची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला येथे घडली आहे. या घटनेत योगेश खुशाल देशमुख (वय ३५) या तरुणाचा भिंतीखाली दबून दुदैवी मृत्यू (Death) झाला आहे. मृतक योगेश देशमुख यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेती काम करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतीचे काम सुरु आहे. त्यामुळे घटनेच्या दिवशी योगेश देशमुख हा सकाळी शेतात गेला होता. शेतावरील काम करून घरी परतला. आणि आपल्या जुन्या घराशेजारी काही काम असल्याने तेथे गेला. 

आपल्या जुन्या घराजवळ काम करत होता. दरम्यान, जवळच असलेल्या एका जुन्या घराची मातीची भिंत अचानकपणे कोसळली. त्यामुळे, भिंती शेजारी काम करीत असलेला योगेश हा त्या भिंतीच्या मलब्यात दाबला गेला. त्याला बाहेर काढण्यास उशीर झाल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला जाऊन त्याचा मृत्यू झाला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गरब्यात मुस्लिमांना नो एण्ट्री? 'हिंदू बना आणि गरब्याला या'; नितेश राणेंच्या विधानानं नवा वाद

Today's Horoscope : गणपती बाप्पाच्या कृपेने 'या' राशींची लॉटरी, तर काहींच्या नशिबात संकटांचा डोंगर; पाहा आजचे राशीभविष्य

Friday Horoscope: अडकलेली कामं मार्गी लागणार, तर काहींना मिळणार नव्या संधींचे संकेत; वाचा राशीभविष्य

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

SCROLL FOR NEXT