Crime News in bhandara SAAM TV
महाराष्ट्र

Bhandara Crime News : महिला वकिलावर जीवघेणा हल्ला; घटस्फोटाच्या खटल्यात बायकोची बाजू मांडल्याचा राग

Bhandara Crime : भंडारा शहरात धक्कादायक घटना घडली. घटस्फोटाच्या खटल्यात पत्नीची बाजू मांडणाऱ्या महिला वकिलावर जीवघेणा हल्ला केला.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

शुभम देशमुख, भंडारा

Bhandara Lawyer Woman Attacked :

भंडारा शहरात धक्कादायक घटना घडली. घटस्फोटाच्या खटल्यात पत्नीची बाजू मांडणाऱ्या महिला वकिलावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सरिता माकडे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महेश डोकरिमारे असं आरोपीचं नाव आहे. माझ्याविरुद्ध ते केस का लढत आहेस, असा जाब विचारून त्याने वकील सरिता माकडे यांच्यावर हल्ला केला. भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात सरिता या वकील म्हणून कार्यरत आहेत. आरोपी महेश याच्याविरुद्ध घटस्फोटाचं प्रकरण सुरू आहे. सरिता या त्याच्या पत्नीच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत. याच रागातून आरोपीने हा हल्ला केला.

जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार

आरोपी महेश याने वकील सरिता यांच्यावर आज सकाळी चाकूने हल्ला केला. यात त्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा जिल्ह्यातील वकील संघटनेने निषेध केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

नगरमध्ये एमआयडीसी परिसरात गुंडांचा धुमाकूळ

अहमदनगरमध्ये एमआयडीसी परिसरात गुंडांनी कोयता आणि पिस्तूल हातात घेऊन धुमाकूळ घातला. एका व्यक्तीवर त्यांनी कोयत्याने वार केले. यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्याला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.

या घटनेनंतर येथील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एमआयडीसी हद्दीत खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुंडांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT