Bhandara Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident : कामावरून घरी परतताना दोघांना डंपरने उडविले; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

Bhandara News : भंडाऱ्यातील गाढवे पेट्रोल पंपावर कामाला होते. दोघांची सोबत ड्युटी असल्याने येणे- जाणे सोबतच करत होते. त्यानुसार आज ड्युटी संपल्याने दोघे दुचाकीने घरी जाण्यासाठी सोबत निघाले होते

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: पेट्रोल पंपावर एकाच ठिकाणी काम करत असलेले दोघेजण ड्युटी आटोपल्याने घरी जाण्यासाठी निघाले. मात्र समोरून आलेल्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. सोबतच सहकारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हृदयद्रावक घटना भंडाऱ्याच्या बेला येथे घडली. या अपघातात नाशिक तिरपुडे (वय ५०, रा. फुलमोगरा) या इसमाचा मृत्यू झाला आहे. तर सहकारी कैलाश गजभिये (रा. अशोकनगर) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघेही भंडाऱ्यातील गाढवे पेट्रोल पंपावर कामाला होते. दोघांची सोबत ड्युटी असल्याने येणे- जाणे सोबतच करत होते. त्यानुसार आज ड्युटी संपल्याने दोघे दुचाकीने घरी जाण्यासाठी सोबत निघाले होते. 

चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू 

दरम्यान आज ड्युटी संपल्यानंतर दोघेही दुचाकीवरून घरी परत जात होते. त्याच वेळी रेतीने भरलेल्या भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. डंपरची जोरदार धडक बसल्याने दोघे जण रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये नाशिक तिरपुडे हे टिप्परच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कैलाश गजभिये रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेत अपघातात जखमीला लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. तर अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहतूक खोळंबली होती. तसेच घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात येत एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून माघार

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT