Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू; भंडारा जिल्ह्यातील घटना, एकजण थोडक्यात बचावला

Bhandara News : हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार मागील दोन- तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: मागील दोन- तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होत आहे. दरम्यान आज सकाळी भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. यातच वीज कोसळून शेतात काम करणाऱ्या दोन शेत मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना  भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील पाथरी शेत शिवारातील सकाळच्या सुमारास घडली आहे. मृतकात एका महिलेचा समावेश आहे. 

हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार मागील दोन- तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी जोरदार वारा देखील आहे. यात काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात आज सकाळी विजेच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली. 

सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू असून शेतातील कामे करण्यासाठी सकाळीच शेतात जात असतात. पावसाची शक्यता असल्याने कामे आवरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आहे. दरम्यान आज सकाळी नेहमीप्रमाणे शेतावर काम करण्यासाठी शेतकरी व शेतमजूर कामासाठी गेले होते. शेतात कामाला सुरवात केली असतानाच अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. यात वीज कोसळून दोन शेतमजुराचा मृत्यू झाला. मृतकात एका महिलेसह पुरुषाचा समावेश आहे. 

एकजण थोडक्यात बचावला 

मनीषा भारत पुष्पतोडे (वय २५) आणि प्रमोद मणिराम नागपुरे (वय ४५) असं विज पडून मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही तुमसर तालुक्यातील पाथरी येथील रहिवासी आहे. यावेळी मृतक मनीषा पुष्पतोडे यांचा सासराही या शेतावर काम करीत होते. मात्र ते त्यांच्यापासून दूर असल्याने या घटनेतून थोडक्यात बचावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Care : तासनतास कमोडवर बसून मोबाईल स्क्रोल केल्याने हार्ट अटॅक येतो? वेळीच व्हा सावध, नाहीतर....

डेलीवेअरसाठी स्टायलिश आणि कम्फर्टेबल मंगळसूत्र; पाहा 5 लेटेस्ट डिझाईन्स!

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

SCROLL FOR NEXT