Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला, ४५ जनावरांची सुटका; कारधा पोलिसांची कारवाई

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील कारधा ठाण्यातील पो. नि. गणेश पिसाळ, पो. ना. विकास जाधव, पो. अ. अमोल वाघ, पो. शि. अमित काळे हे कारधा चौकात रात्री गस्तीवर होते.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जवळील कारधा चौकात मध्यरात्री दरम्यान कारधा पोलीस रात्र गस्तीवर वाहनांची तपासणी दरम्यान कत्तलीच्या उद्देशाने जनावरांना घेऊन जाणाऱ्या ट्रक पकडण्याची कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ७ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ४५ जनावरांची सुटका केली.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील कारधा ठाण्यातील पो. नि. गणेश पिसाळ, पो. ना. विकास जाधव, पो. अ. अमोल वाघ, पो. शि. अमित काळे हे कारधा चौकात रात्री गस्तीवर होते. या दरम्यान त्यांनी वाहनांची तपासणी करीत होते. या तपासणी दरम्यान ट्रकला थांबवून चौकशी केली असता ट्रकमध्ये ४५ जनावरे निर्दयतेने कोंबून नेट असल्याचे निदर्शनास आले. ही जनावरे कत्तलीकरीता नेत असल्याच्या प्राथमिक संशयावरून (Police) पोलिसांनी ट्रक जप्त केला. 

ट्रक चालकावर गुन्हा दाखल 

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ४५ जनावरांची सुटका केली. यानंतर सर्व जनावरांना मालीपार चांदोरी येथील गो शाळेत पाठविण्यात आले. तसेच या कारवाईत सुमारे ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच पोलिसांनी ट्रक चालक मोहम्मद युसूभरा. मुर्तीजापूर याचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा आणखी तपस पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT