Howrah Express Saam tv
महाराष्ट्र

Howrah Express: अहमदाबाद- हावडा एक्सप्रेसवर दगडफेक; प्रवाशी भयभीत, एसी डब्याच्या काचा फुटल्या

Bhandara News : अहमदाबाद- हावडा एक्सप्रेसवर दगडफेक; प्रवाशी भयभीत, एसी डब्याच्या काचा फुटल्या

Rajesh Sonwane

शुभम देशमुख

भंडारा : महाराष्ट्रातील नागपूर रेल्वे विभाग परिसरात अहमदाबाद ते हावडा रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या हावडा एक्सप्रेस ट्रेनवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे. तुमसर तिरोडा दरम्यान झालेल्या या दगडफेकीत (Railway) रेल्वेच्या B3 एसी कोचच्या काचा फुटल्या. या घटनेने डब्यात (Bhandara) बसलेले प्रवासी भयभीत झाले. मात्र, एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. (Tajya Batmya)

हावडा एक्सप्रेस सोमवारी २८ ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नागपूर विभागातील तुमसर ते तिरोडा स्थानकांदरम्यान आली असतांना रेल्वेवर दगडफेक झाल्याची घटना घडल्याचे रेल्वे प्रवाशांनी सांगितले. यामध्ये बी-3 कोचच्या ४१-४८ क्रमांकाच्या सीटच्या खिडकीच्या काचा फुटल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशी भयभीत झाले होते. 

रेल्वे पथकाकडून पंचनामा 

घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले. तिरोडा रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT