Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Sand Mafia : वाळू माफियाची मुजोरी; नायब तहसीलदार, पोलीस पाटलाला धक्काबुक्की

Bhandara News : वाळूचा उपसा करून त्याची विना परवाना विक्री करणाऱ्या वाळू माफियानं नायब तहसीलदार आणि पोलीस पाटलासोबत हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार खमारी गावात घडला

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: वाळू माफियांची मुजोरी पुन्हा एकदा भंडाऱ्यात पाहण्यास मिळाली आहे. नदीतून वाळू उपसा केला जात असताना विचारणा करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार आणि गावच्या पोलीस पाटलाला वाळू माफियाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील खमारी गावात सदरची घटना घडली आहे. वाळू तस्करांकडून परवानगी नसताना नदीतून वाळूचा उपसा करण्यात येत आहे. प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असताना देखील हे प्रकार सुरु असून कारवाईसाठी जाणाऱ्या पथकावर या वाळू तस्करांकडून हल्ले करण्यात येत असतात. असाच प्रकार वाळूचा उपसा करून त्याची विना परवाना विक्री करणाऱ्या वाळू माफियानं नायब तहसीलदार आणि पोलीस पाटलासोबत हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार खमारी गावात घडला.

धक्काबुक्की करत काढला पळ 

मोहाडी तालुक्यातील खमारी येथील नदीपात्रातून वाळूचा उपसा करण्यात येत होता. वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावर मोहाडीचे नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार हे खमारी गावात पोहचले. यावेळी पोलीस पाटील कुवरलाल दमाहे हे देखील तेथे पोहचले. यावेळी वाळू माफियाने नायब तहसीलदार आणि पोलीस पाटील या दोघांसोबत वाद घालून त्यांना धक्काबुक्की करून वाळू रस्त्यावर टाकून ट्रॅक्टर चालकानं पळ काढला. 

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान या घटनेनंतर गावात चांगलाच तणाव निर्माण झाला. यावेळी ग्रामस्थांनीही नायब तहसीलदार आणि पोलीस पाटलांना वाळूच्या अवैध वाहतुकीवर निर्बंध लावावा यासाठी त्यांना घेराव घातला. तर वाळू माफियांकडून करण्यात आलेल्या या प्रकाराबाबत मोहाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

SCROLL FOR NEXT