Ration Shop Saam tv
महाराष्ट्र

Ration Shop : पुरवठ्यापेक्षा अधिक धान्यसाठा; रेशन दुकानाचा परवाना रद्द

Bhandara News : जिल्ह्यातील भंडारा तालुका अंतर्गत असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी सिल्ली अंतर्गत रास्तभाव दुकान आहे. या रेशन दुकानास १९ डिसेंबर २०२४ तालुका निरीक्षक यांनी पाहणी केली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: रेशन दुकानांमध्ये काळाबाजार केला जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यानुसार सिल्लीच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या रेशन धान्य दुकानात अपेक्षित स्टॉक पेक्षा अधिक धान्यसाठा आढळल्याने काळाबाजार करण्याचा संशय आहे. यावरून रेशन दुकानावर कारवाई करण्यात आली असून परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक आणि सचिवावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे. 

जिल्ह्यातील भंडारा तालुका अंतर्गत असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी सिल्ली अंतर्गत रास्तभाव दुकान आहे. या रेशन दुकानास १९ डिसेंबर २०२४ तालुका निरीक्षक यांनी पाहणी केली असता, अनेक त्रुट्या आढळून आल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने दुकानातील धान्य साठ्यामध्ये ५.६७ क्विंटल गहू व १५.१० क्विंटल तांदूळ जास्त आढळून आलेला आहे. या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली. 

अखेर परवाना रद्द 

दरम्यान अतिरिक्त धान्यसाठा कुठून आला, कुठल्या गैर पद्धतीने खरेदी करण्यात आला, याचे योग्य उत्तर देऊ न शकल्यामुळे सदरचा संस्थेचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी तपासणीच्या नियमानुसार रद्द करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी देखील या संस्थेत मोठा घोटाळा व आर्थिक अहवालात बनावटी कागदपत्रांचा वापर. गावातील काही मृत कुटुंबीयांच्या नावाने रेशन वाटप केल्याचा ठपका होता.  

संचालक मंडळावर गुन्हा दाखलची मागणी 

दरम्यान या संस्थेचे सचिव यांच्या अशा बोगस व्यवहारातून अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यात आले आहेत, त्याची देखील तपासणी करावी व संस्था अध्यक्ष बावनकुळे व सचिव आर. आर. भंडारकर तथा कार्यकारिणी मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडच्या देगलूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Gokul Election 2026: सतेज पाटलांनी विरोधकांना दाखवलं आस्मान; वाचा विजयी उमेदवरांची यादी

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

Tuesday Horoscope : दसऱ्याचा दिवस शुभ ठरणार, मोठे अडथळे दूर अन् काहींना होणार धनलाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

SCROLL FOR NEXT