Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : पालकांसोबत मुख्याध्यापकाची दादागिरी, शिवीगाळ करत केली मारहाण; ऑडियो क्लिप व्हायरल

Bhandara News : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील युएसए विद्या निकेतन शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा पालक हे विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत शाळेत जाब विचारण्यासाठी गेले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील युएसए विद्या निकेतन शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत (Bhandara) असलेल्या विद्यार्थ्यांचा पालक हे विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत शाळेत जाब विचारण्यासाठी गेले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकाने पालकांसोबत दादागिरी केली. शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार घडला असून यासंबंधी आडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (Latest Marathi News)

भंडारा जिल्ह्याची कुबेरनगरी व शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या तुमसर शहरात युएसए विद्या निकेतन शाळा (School) आहे. या शाळेत नागेश्वर राऊत यांचा मुलगा दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलाला शाळेत काही समस्या असल्याने याबाबत मुलाचे वडील अर्थात नागेश्वर राऊत हे शाळेत जाब विचारण्यासाठी गेले असता मुख्याध्यापकाने पालकाला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली आहे. याचा ऑडिओ सद्या चांगलाच वायरल झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिक्षण विभागाकडे तक्रार 

आता याची तक्रार पालकांनी शिक्षण विभागाकडे (Education Department) केली आहे. हा ऑडिओ वायरल होताच इतर पालकांनी देखिल शाळेत जात मुख्याध्यापक पिल्ले यांना जाब विचारला. या प्रकाराबाबत मुख्याध्यापकावर कारवाई व्हावी; अशी मागणी देखिल पालकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT