Nana Patole Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole: मोदी- शहा यांनी लिहिलेली स्क्रिप्ट एकनाथ शिंदे वाचत होते; नाना पटोलेंचा आरोप

मोदी- शहा यांनी लिहिलेली स्क्रिप्ट एकनाथ शिंदे वाचत होते; नाना पटोलेंचा आरोप

अभिजीत घोरमारे

भंडारा : दोन शाहिर रात्रभर भांडुन लोकांचे मनोरंजन करतात. तसे दसरे मेळावे झालेत. असे परखड़ मत व्यक्त करत (Congress) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दसरा मेल्याव्याची खिल्ली उडविली. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दसरा मेळाव्यात मोदी- शहा यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचुन दखविल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. (Bhandara Nana Patole News)

मुंबई (Mumbai) येथे बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्‍याच्‍या (Dasara Melava) सभेत कॉंग्रेसवर जबर टिका केली. तर उद्भव ठाकरे यांच्या मेळाव्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे कार्यकर्ते असल्याच्या व राहुल गांधी यांच्या भारत जोड़ो यात्रेत ठाकरे समर्थकाचा भरना असल्याच्या आरोप शिंदे यांनी केला होता. त्यावर नाना पटोले (Nana Patole) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

शाहिरांच्‍या भांडणासारखे दसरा मेळावे

दोन शाहिर रात्रभर भांडुन लोकांचे मनोरंजन कसे करतात तसे दसरा मेळावे झाले आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी केलेले कॉंग्रेसवरील आरोप तेही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीने हास्यास्पद असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. यावेळी राहुल गांधी भारत जोडो यात्रेत प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची पाठराखन पटोले यांनी केली आहे.

मोदी सरकारचा अंतिम क्षण

राहुल गांधी यांच्या भारत जोड़ो यात्रेला भेटलेला प्रतिसाद लक्षात घेता हा केंद्रातील मोदी सरकारचा अंतिम क्षण असून हे सरकार जाणार आहे. त्यामुळे किती कोणाला पद वाटायचे वाटून घ्या; असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

भिंवडी पोटनिवडणूकीत शिवसेनेला पाठींबा

भिंवडी पोटनिवडणूकमध्ये कॉंग्रेस आपला उमेदवार उभा करणार नसून कॉंग्रेस आपला पाठिंबा शिवसेना उमेदवाराला देणार असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

50 हजार फॉलोअर्स असलेली रिलस्टार निघाली चोर, बॉयफ्रेंडच्या मदतीने करायची महिलांच्या पर्स लंपास

Maharashtra Live News Update: पुण्यात मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

Maharashtra Politics: रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं विरोधकांची कोंडी, शिंदेसेनेविरोधात चव्हाणांची रणनीती काय?

IND vs SA ODI: क्विंटन डी कॉकच्या विकेटनंतर कोहलीचं भन्नाट सेलिब्रेशन; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय कृषीमंत्री-मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद? राज्याने केंद्राला अतिवृष्टीचा प्रस्ताव पाठवला की नाही?

SCROLL FOR NEXT