Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : भंडाऱ्यात भीषण दुर्घटना; खाणीत काम करताना ढिगाऱ्याखाली पाच कामगार दबले, दोघांचा मृत्यू

Bhandara Tumsar News : मोईल्स मॅग्निज काढण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. मॅग्नीज ब्लास्टिंगनंतर त्यातील मॅग्नीज काढण्याकरिता सकाळी सहा ते सात कामगार अंडरग्राउंड माईन्स मध्ये कामाकरिता गेले होते

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील भूमिगत चिखला येथील मॅग्निसच्या खाणीत भीषण दुर्घटना घडली आहे. खोदकाम सुरु असताना कामगारांच्या अंगावर अचानक ढिगारा कोसळला. यात कामगार दबले गेले असून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार दबले असल्याची माहिती समोर येत असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला येथे असलेल्या मॉइल्स मॅग्नीज खाणीत सदरची दुर्घटना घडली आहे. याठिकाणी मोईल्स मॅग्निज काढण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. मॅग्नीज ब्लास्टिंगनंतर त्यातील मॅग्नीज काढण्याकरिता सकाळी सहा ते सात कामगार अंडरग्राउंड माईन्स मध्ये कामाकरिता गेले होते. मॅग्नीज काढण्याचं काम सुरू असताना अचानकपणे गदेघाट मधील तिसरी लेवल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. 

१०० मीटर खोल दबले कामगार 

चिखला मॉइल्सची २४४५ नंबरच्या फेसमध्ये अंडरग्राउंडमध्ये १०० मीटरच्या आत ही दुर्घटना घडली आहे. या घडलेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली पाच ते सहा कामगार दबले गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यात दोन कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आणि एका व्यक्तीला उपचारासाठी भंडारा हलविले असल्याची माहिती खान सहायक मॅनेजर भाटिया यांनी दिली. 

कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु 

दरम्यान १०० मीटर खोल भागात ढिगारा कोसळल्याने पाच ते सहा कामगार दबले गेले आहेत. यातील दोन जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले असून आणखी काही कामगार दबून असल्याची भीती व्यक्त होत आहे. या कामगारांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT