Bhandara Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Heavy Rain : महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांचा संपर्क तुटला; बपेरा पूलावर चार फुटापर्यंत पाणी, नदी काठचा गावात शिरले पुराचे पाणी

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात वैनगंगा नदी काठच्या बाम्हणी गावात पुराचे पाणी गावात शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा बपेरा पूलावर ३ ते ४ फूट पाणी असल्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांचा संपर्क तुटला आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात वैनगंगा नदी काठच्या बाम्हणी गावात पुराचे पाणी गावात शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर शेकडो एकर शेती पाण्याखाली आल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. अशीच परिस्थिती सर्वच तालुक्यात पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे मागच्या पंधरा दिवसापासून पावसाने पाठ फिरविली होती. मात्र दोन दिवस सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.  

अनेक गावांचा संपर्क तुटला
भंडारा जिल्ह्यात दोन दिवसापासून (Heavy Rain) मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी- नाले ओसंडून वाहत आहेत. भंडारा जिल्ह्यातील जीवनदायी समजली जाणारी वैनगंगा नदी ही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. भंडारा तालुक्यातील खमारी गावाजवळील छोटा पूल हा पाण्याखाली गेला असून जवळपास २५ गावांच्या संपर्क तुटला आहे. पलीकडे गावकऱ्यांना ये जा करायची असल्यास लांब फेऱ्यांनी जावे लागत आहे. पूर परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचा चित्र आपल्याला दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT