Bhandara news Saam tv
महाराष्ट्र

Bhandara : अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर धाड; गोबरवाही पोलिसांची मोठी कारवाई

Bhandara news : माहितीच्या आधारे बावनथडी नदीपात्रातून दोन ट्रॅक्टरने अवैधरित्या रेतीची चोरी होत असल्याची माहिती गोबरवाही पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकत कारवाई

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न कायम आहे. प्रशासनाकडून अनेकदा कारवाई केल्यानंतर देखील चोरटी वाळू वाहतूक सुरूच आहे. अशाच प्रकारे वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर गोबरवाही पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये १२ लाख रुपयांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरच्या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील डोंगरी बु. परिसरात पोलिसांकडून पेट्रोलिंग केली जात असताना वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे बावनथडी नदीपात्रातून दोन ट्रॅक्टरने अवैधरित्या रेतीची चोरी होत असल्याची माहिती गोबरवाही पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकत कारवाई केली. 

वाळू वाहतुकीची परवानगी नव्हती 

या कारवाईमध्ये रोहणा टोला रोडने पेट्रोलिंग करीत असताना रणजीत झनक पटले (वय २९, रा. साखळी ता. तुमसर) व निळ्या रंगाचा ट्रॅक्टर चालक नामे अल्पेश युवराज सेलोकर (वय २३, रा. रोहना) यांना अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना रंगेहात पकडण्यात आले. यावेळी पोलिसांनी परवानाची विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणतेही परवाने नसल्याने दोन्हीही ट्रॅक्टरला जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. 

१२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 

दरम्यान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच कारवाईत रेतीसह बारा लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोघांविरोधात पोलिसात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. यामुळे किमान पुढील काही दिवस वाळू तस्करीला चाप बसणार असल्याचे पाहण्यास मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT