Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: रुग्णालयात दाखल पतीचा डबा करताना घडले अघटीत; गॅस लिकेजमुळे घराला आग

रुग्णालयात दाखल पतीचा डबा करताना घडले अघटीत; गॅस लिकेजमुळे घराला आग

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख

भंडारा : रुग्णालयात दाखल पतीसाठी डबा घेऊन जाण्यासाठी सकाळच्या सुमारास पत्‍नी स्वयंपाक करत होती. याचवेळी (Gas) गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे अचानक आग लागून घर पेटल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने (Bhandara) या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. (Tajya Batmya)

भंडारा जिल्‍ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे सदर घटना आज सकाळी घडली. भाऊराव भिवा दिघोरे असे घटनेतील पीडित घर मालकाचे नाव आहे. भाऊराव दिघोरे हे काही दिवसांपासून उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. पत्‍नी दररोज सकाळी पतीचा डबा घेवून रुग्णालयात जात असते. त्‍यानुसार दररोजप्रमाणे पत्‍नी आज देखील डबा करायला किचनमध्‍ये गेली. याचवेळी गॅस गळती होवून स्‍फोट झाला व आग (Fire) लागली.

मोठे आर्थिक नुकसान

गॅस गळती होवून घराला आग लागल्‍यामुळे घर जळाले आहे. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित गॅस कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्याची गावकऱ्यांसह पीडित कुटुंबीयांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संभाजीनगरमध्ये २३ नगरसेवक अपात्र ठरणार? प्रशासनाकडून नोटीस जारी; कारण काय?

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

SCROLL FOR NEXT