MSRTC Bus Saam tv
महाराष्ट्र

एसटीलाही महापुराचा फटका; महामंडळाचे 22 लाख 88 हजारांचे नुकसान

एसटीलाही महापुराचा फटका; महामंडळाचे 22 लाख 88 हजारांचे नुकसान

अभिजीत घोरमारे

भंडारा : भंडारा जिल्ह्यात दोन आठवडे अतिवृष्टी आणि महापूर आला होता. यामुळे वैनगंगेसह नदी- नाल्यांना आलेल्या पुराने मार्ग बंद असल्याचा फटका एसटी महामंडळाला (MSRTC) बसला असून आठ दिवसात 22 लाख 88 हजार 442 रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल 54 हजार 959 किलोमीटरचे शेड्यूल या काळात रद्द झाले आहे. (Bhandara News MSRTC Bus)

वैनगंगा नदीला तर 15 व 17 ऑगस्ट असा पूर आला होता. तसेच (Bhandara) जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदी व नाल्यांनाही मोठा पूर आला होता. जिल्ह्यातील बहुतांश मार्ग या काळात बंद होते. 17ऑगस्टला तर जिल्ह्यातील तब्बल 82 मार्ग पुरामुळे (Heavy Rain) महामंडळाचे मोठे नुकसान झाले. यामुळ महामंडळाला 54 हजार 959 किलोमीटर शेड्यूल रद्द करावे लागले. प्रति किलोमीटर 38 रुपयांप्रमाणे 22 लाख 88 हजार 442 रुपयांचे पुरामुळे नुकसान झाले आहे.

चार दिवस सेवा ठप्‍प

गोंदिया, पवनी, तिरोडा, ठप्प झाले होते. या काळात एसटी साकोली, लाखांदूर, मोहाडी, तुमसर या मार्गावरील वाहतूक तीन ते चार दिवस ठप्प होती. त्यामुळे एसटी बसेस 40 तर मानवविकासचे 91 बसेसही जागेवरच उभ्या होत्या. रस्ता बंद होऊन एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे. आधीच कोरोना आणि नंतर संपाने मोडलेले एस टी कंबरडे पुन्हा महापुराने मोडले गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Dates vs Raisins : खजूर की मनुका, दोघांपैकी काय आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर

Less Water Drinking: दिवसभर पाणी कमी पिण्याची सवय ठरू शकते धोकादायक; शरीरावर होतात 'हे' ७ परिणाम

SCROLL FOR NEXT