Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara : धान्याच्या पोत्याखाली दबून वाहन चालकाचा मृत्यू; दोन मजूर जखमी

Bhandara News : मिटेवानी येथील भाऊजी सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था संचालित धान खरेदी केंद्राचे धान गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये धानाने भरलेल्या पोत्याचे ढिगारे लावण्याचे काम करण्यात येत होते

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: गोडाऊनमध्ये लावण्यात येत असलेले धानाचे पोते एकावर एक अशा पद्धतीने रचले जात होते. मात्र पोत्यांचा ढीग जास्त उंच झाल्याने पोते कोसळले. भरलेले पोते तेथे उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर पडले. यात वाहन चालकाचा दाबून मृत्यू झाला तर अन्य दोन मजूर जखमी झाले आहेत. सदरची घटना भंडारा जिल्ह्यातील मिटेवानी येथे घडली आहे.  

भंडारा जिल्ह्यातील तुमसरच्या बडा बाजार येथील राजेश बिसने (वय ४५) असे घटनेत मृत झालेल्या चालकाचे नाव आहे. मिटेवानी येथील भाऊजी सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था संचालित धान खरेदी केंद्राचे धान गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये धानाने भरलेल्या पोत्याचे ढिगारे लावण्याचे काम करण्यात येत होते. काही मजूर पोते वाहून आणत होते, तर काहीजण ढिगारे रचण्याचे काम करत होते. 

ढिगाऱ्यावरील पोते अचानक कोसळले 

दरम्यान पोत्यांचे ढिगारे वाजवीपेक्षा जास्त उंचीचे व असुरक्षितरीत्या लावण्यात येत होते. ढिगारे लावण्याकरिता तिथे मजूर काम करीत असताना अचानक ढिगाऱ्यावर ठेवण्यात आलेले काही पोते खाली कोसळले. यावेळी तिथे काम करीत असलेल्यापैकी दोन मजुरावर व तिथे उभा असलेल्या वाहन चालक राजेश बिसने यांच्यावर कोसळला. तिघेही धानाच्या पोत्याखाली दबले गेले. 

मजुरांनी धाव घेतली पण.. 

पोते कोसळल्याचे पाहून सोबत काम करीत असलेल्या मजुरांनी धाव घेत पोत्यांच्या ढिगाऱ्याखालून तिघांना बाहेर काढले. यानंतर त्यांना तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले. यात राजेश बिसने यांचा मृत्यू झाला. तर दोघे मजूर गंभीर जखमी झाले आहेत. यातील ज्ञानेश्वर लसुंते यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथे हलविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

SCROLL FOR NEXT