Bear Attack Saam tv
महाराष्ट्र

Bear Attack : अस्वलाचा हल्ला; प्रतिकार करत दिली झुंज, देवरी जंगलात गेलेला गुराखी गंभीर जखमी

Bhandara News : सकाळी दुधराम बकऱ्यांच्या चारा आणण्यासाठी जंगलात गेला होता. चारा कापत असताना अचानकपणे अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्ह्यातील देवरी जंगलात शेळ्यांसाठी चारा आणण्याकरिता गेलेल्या एका व्यक्तीवर अस्वलाने अचानक हल्ला केला. अस्वलाने हल्ला केल्यानंतर गुराखी न घाबरता त्याने अस्वलासोबत झुंज दिली. बराचवेळ झटापट करत आपली सोडवणूक केली. दरम्यान अस्वलाच्या हल्ल्यात  गंभीर जखमी झाला आहे. 

दुधराम सखाराम बनकर (वय ५५) असे त्याचे नाव असून तो वाकल या गावात राहणारा आहे. विशेष म्हणजे १२ दिवसांत अस्वलाने हल्ला केलेली ही दुसरी घटना आहे. ही घटना देवरी (हमेशा) जंगलात कक्ष क्रमांक ३०१ संरक्षित वनमध्ये सकाळी घडली. सकाळी दुधराम बकऱ्यांच्या चारा आणण्यासाठी जंगलात गेला होता. चारा कापत असताना अचानकपणे अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, दुधरामने प्रसंगावधान राखून अस्वलाशी झुंज दिली.

बराच वेळ त्या दोघांमध्ये झटापट सुरू होती. या दरम्यान बचावासाठी  दुधराम हा जोरजोराने ओरडत होता. हे ऐकून जवळपास असणारे तई व वाकलचे शेळीपालक धावत आले. यानंतर त्यांनी सुटका केली. दरम्यान जंगलात अस्वलाने प्राणघातक हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नागपूरला रेफर करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अवकाळी वाऱ्याचा तडाखा, कल्याण-डोंबिवली, परिसरात ढगाळ वातावरणसह सोसाट्याचा वारा

Avoid Sugar Benefit: दिवसाला किती साखर किंवा गोड पदार्थ खल्ले तर शरिराला त्रास होत नाही?

Sunetra Pawar : 2029 मध्ये वहिनींनी मुख्यमंत्री व्हावं, जय पवार यांचं सुनेत्रा पवारांबद्दल मोठं विधान, VIDEO

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Dhule Tourism: लोणावळा-खंडाळा विसरा! धुळ्याजवळच्या 'या' थंड हवेच्या ठिकाणी नक्की फिरून या

SCROLL FOR NEXT