Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : वेल्डिंग काम करताना कोसळला लोखंडी रॉड; कामगाराचा मृत्यू

Bhandara News : जे. के. ट्रान्सपोर्ट नामक कंत्राटदाराकडे कार्यरत होते. सायंकाळच्या सुमारास वेल्डिंगचे कार्य सुरू होते. याचवेळी त्यांच्या अंगावर लोखंडी ट्रेलरचा मोठा रॉड कोसळला.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: वेल्डिंगचे काम करीत असताना अंगावर लोखंडी ट्रेलरचा मोठा रॉड कोसळला होता. यात ४९ वर्षीय कंत्राटी कामगार गंभीररीत्या जखमी झाला. यात त्याचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. सदरची घटना वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत घडली.

भंडारा (Bhandara) शहरातील लाला लजपतराय परिसरातील कुंवरलाल रहांगडाले (वय ४९) असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे. कुंवरलाल रहांगडाले हे सनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. ते जे. के. ट्रान्सपोर्ट नामक कंत्राटदाराकडे कार्यरत होते. सायंकाळच्या सुमारास वेल्डिंगचे कार्य सुरू होते. याचवेळी त्यांच्या अंगावर लोखंडी ट्रेलरचा मोठा रॉड कोसळला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांना तात्काळ भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मदतीची मागणी 

दरम्यान कुंवरलाल यांना रुग्णालयात नेले असता त्याच्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा (Death) मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मृत कुंवरलाल रहांगडाले हे घरचे कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT