Bhadara Tumsar Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Bhandara News : भंडाऱ्यातील तुमसरमध्ये हिट अँड रनचा थरार, मद्यधुंद कारचालकाने सायकलस्वार मजुरांना उडवलं

Satish Daud

शुभम देशमुख, साम टीव्ही

भंडाऱ्यातील देव्हाडी-तुमसर राज्य महामार्गावर शुक्रवारी एक भयानक घटना घडली. एका मद्यधुंद कारचालकाने सायकलवरून घरी निघालेल्या २ मजुरांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की सायकलस्वार १० ते १५ फूट दूर जाऊन कोसळले. सुदैवाने या घटनेत दोघांचाही जीव वाचला. मात्र, अपघातात एका मजुराला गंभीर दुखापत झाली आहे.

त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातानंतर कारचालक हा फरार झाला असून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. मनोज परसगडे (४०) रा. माकडे नगर तुमसर असे अपघातातील जखमी मजुराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज हा देव्हाडी येथील एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करतो. सायंकाळी तुमसर (Bhandara News) येथे घरी जाण्याकरिता मनोज व त्याच्या एक मित्र सायकलने निघाले. देव्हाडी तुमसर या राज्य महामार्गावरील मोर केमिकल जवळ एका भरधाव स्विफ्ट कारने मनोज याच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.

कारची धडक बसताच मनोज हा पुलाच्या कठड्याला जाऊन धडकला. तर त्याच्या दुसरा मित्र बाजूला फेकला गेला. कठडा व कारचे लोखंडी भाग मनोजच्या डोक्याला व डाव्या पायाला लागले, त्यात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर (Accident) कार चालक विनोबा भावे हा बायपास रस्त्याने पसार झाला.

पाठीमागून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी जखमी मनोजला रस्त्याच्या बाजूला केले. या अपघाताची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांना भ्रमणध्वनीवर देण्यात आली. पोलिसांच्या वाहनातून उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरीता नेण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून मनोजला भंडारा येथे रेफर केले. दरम्यान, कारचालक हा मद्यपान करून गाडी चालवत होता. मनोजला धडक देण्यापूर्वी त्याने शाळेतून कर्तव्य बजावून परत येणाऱ्या शिक्षकाला कारने कट मारली. सुदैवाने ते शिक्षकही थोडक्यात बचावले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT