Bullock Cart Race Saam tv
महाराष्ट्र

Bullock Cart Race : बैलगाडी स्पर्धेदरम्यान बैल बिथरले; अंगावर आल्याने वृद्ध ३ फुट उंच फेकले गेल्याने जखमी

Bhandara News : सेलोटी मानेगाव बेळा येथे १५ ते १६ जानेवारीला भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान वेगाने जाणारी बैल जोडीचे बैल बिथरले आणि प्रेक्षकांच्या गर्दीत बैल जोडी सकट घुसले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सेलोटी गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैलाच्या शंकर पटाचा (Bhandara) आनंद घेत असताना गाफील राहणे एका वयोवृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. स्पर्धे दरम्यान बिथरलेली बैलजोडी अचानक अंगावर आल्याने ७० वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. (Tajya Batmya)

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सेलोटी येथे ही घटना घडली आहे. (Bullock Cart Race) या घटनेत बिंदू गणवीर (वय ७०) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. त्याच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. सेलोटी मानेगाव बेळा येथे १५ ते १६ जानेवारीला भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान वेगाने जाणारी बैलगाडीचे बैल बिथरले आणि प्रेक्षकांच्या गर्दीत बैल जोडी सकट घुसले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गर्दी पाहून बिथरलेली बैलजोडी कुठेही पडायला लागले. यात समोरून येणाऱ्या वेगवान बैल जोडी समोर बिंदू गणवीर आल्याने बैल जोडीने त्यांना उडविले. यात ते तीन फूट उंच हवेत फेकले जाऊन जमिनीवर जोरदार आपटले. यात ते गंभीर जखमी झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून जखमी व वृद्धाबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : "माझ्याशी फोनवर बोल नाहीतर...", १७ वर्षीय मुलीला धमकी; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO

Shravan 2025: श्रावण उपवासासाठी 'हे' ७ हेल्दी फूड आणि पौष्टिक पदार्थ पर्याय ठरतील फायदेशीर

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

Bollywood Celebrities Restaurants : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या 'या' रेस्टॉरंट्समध्ये तुम्ही कधी गेलाय का?

SCROLL FOR NEXT