Bhandara Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime : वडिल रागावल्याने घरातून निघून गेला; दोन महिन्यांपासून बेपत्ता युवकाचा जंगलात आढळला मृतदेह

Bhandara News : ११ नोव्हेंबरला गावाजवळील चुलबंद नदीवर मासे पकडण्यासाठी गेला होता वडिलांनी त्याला फोन केला मात्र त्याने कॉल रिसिव्ह केला नाही घरी परतल्यावर वडिलांनी त्याला कॉल न स्वीकारल्याबद्दल रागावले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: वडिलांनी रागावल्यामुळे सुमारे दोन महिन्यांपूर्वी घर सोडून निघून गेलेल्या कोच्छी येथील २४ वर्षीय युवकाचा मृतदेह गावालगतच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. संपूर्णपणे सडलेल्या स्थितीतील आढळून आलेल्या मृतदेहाचा पंचनामा करत पोलिसांनी गावकरी आणि त्याच्या पालकांकडून शहानिशा करून ओळख पटविली. 

विनोद ताराचंद मेश्राम असे या मृत युवकाचे नाव आहे. विनोद हा मागील दोन महिन्यांपूर्वी वडिलांनी हटकले असता नाराज झालेल्या विनोदने घरातून निघून जात स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना भंडारा जिल्ह्यातील कोच्छी येथील जंगल परिसरात उघडकीस आली. या घटनेत स्थानिक कोच्छी येथील विनोदचाच असल्याचे वडील व गावकऱ्यांनी ओळखल्याने स्पष्ट झाले आहे. 

फोन न उचलल्याने वडील रागावले 

विनोद मेश्राम हा युवक मागील वर्षी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गावाजवळील चुलबंद नदीवर मासे पकडण्यासाठी गेला होता. वडिलांनी त्याला फोन केला. मात्र त्याने कॉल रिसिव्ह केला नाही. त्यामुळे तो घरी परतल्यावर वडिलांनी त्याला मोबाइलवरील कॉल न स्वीकारल्याबद्दल रागावले होते. तेव्हापासून विनोद हा बेपत्ता झाला होता. त्याचा पालक व नातेवाईकांकडून शोध सुरु असताना सापडला नव्हता. 

सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांना दिसला मृतदेह 

दरम्यान, सकाळच्या सुमारास काही महिला जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असता जंगलातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती महिलांनी गावकऱ्यांना दिली. विनोद दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या पालकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळाला जात पाहणी केली. त्याच्या पालकांनी मृतदेहाची ओळख पटवून तो विनोदच असल्याचे सांगितले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

निवडणुकीत गडबड झाली तर याद राखा; SIRच्या वादादरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT