Bear Attack Saam tv
महाराष्ट्र

Bear Attack : तेंदू पत्ता संकलन करणाऱ्या इसमावर अस्वलाचा हल्ला; हल्ल्यात ६० वर्षीय इसम गंभीर जखमी

Bhandara News : तेंदु पत्ता संकलन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच दरम्यान रमेश आंबेडारे हे तेंदु पत्ता संकलन करत असताना अचानक अस्वलीने त्यांच्यावर हल्ला चढवीला

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : जंगल परिसरात या दिवसात तेंदू पत्ता संकलनाचे काम केले जाते. अशाच प्रकारे तेंदू पत्ता संकलन करण्यासाठी (Bhandara) गेलेल्या इसमावर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. यात सदर इसम गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मुर्जा पारडी येथे घळली आहे. 

रमेश हागरू आंबेडारे (वय ६०) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तेंदु पत्ता संकलन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच दरम्यान रमेश आंबेडारे हे तेंदु पत्ता संकलन करत असताना अचानक (Bear) अस्वलीने त्यांच्यावर हल्ला चढवीला. यात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत केली आहे. सदर घटना सोबत काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी अस्वलाला हाकलून लावले. 

यानंतर गंभीर जखमी झालेल्या रमेश यांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी आणण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय ठाकरे यांनी जखमीवर उपचार केले. सदर घटनेची माहिती लाखांदूर (Forest Department) वन विभागाला होताच वनपरिक्षेत्र अधिकारी हे जखमीच्या भेटीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. जखमीला शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड, आधी अत्याचार मग महिलांचा गर्भपात करायचा

Weight Loss Drink Recipe : रिकाम्या पोटी प्या एक ग्लास 'हे' ड्रिंक, १५ दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल फिट

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Latur Police: लाच घेताना पोलिस निरीक्षकाला अटक, ACB ची मोठी कारवाई; पोलिस दलात खळबळ

Crime: वर्षभरापूर्वी लग्न, नवऱ्याचे अनैतिक संबंध; मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या बायकोची आत्महत्या, संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT