Accident Saam tv
महाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; रात्री अपघात सकाळी मिळाले शव

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; रात्री अपघात सकाळी मिळाले शव

अभिजीत घोरमारे

भंडारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रात्रीच्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर- साकोली या मुख्य मार्गावरील दांडेगाव जंगलपरिसरात घडली. सकाळी त्याच्या मृतदेह मिळाल्याने संबधित अपघाताची (Accident) उघड झाली आहे. (bhandara accident news Two wheeler killed in collision with unknown vehicle)

बारवा येथील (Bhandara) रहिवासी समिर सरजेराव कावळे (वय 25३ असे मृतकाचे नाव आहे. समीर हा लाखांदूर येथील गुरुनानक कपडा शोरुममध्ये काम करत होता. तो शनिवारी रात्री 9 वाजता आपले काम आटपुन बारवा येथे गावी मोटारसायकल (क्र. एमएच 36, पी 1806) दुचाकीने परत जात होता. या दरम्‍यान दांडेगाव जंगल परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने समीर याचा जागीच (Accident Death) मृत्यू झाला.

रात्रभर पडून सकाळी घटना आली लक्षात

सदर घटनेची माहिती सकाळी नागरीकांना लक्षात आली. घटनेची माहिती दिघोरी मोठी पोलिसांना देण्यात आली आहे. घटनास्थळी दिघोरी मोठी पोलिस (Police) दाखल होऊन त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पुढील तपास सूरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Puja Samagri List: गणपती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

४ मुली, १ मुलगा अन् गेस्ट हाऊसमधला तो रूम...पोलिसांची अचानक धाड पडताच उडाली खळबळ; आक्षेपार्ह साहित्य जप्त

Cloves-Garlic Benefits : रोज खा लवंग-लसूण; हृदयासह मेंदूही राहील तंदुरुस्त, ७ जबरदस्त फायदे वाचाच

8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

SCROLL FOR NEXT