Accident News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident News: भीषण अपघात! दुचाकी आणि रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक; ७ जण जखमी

Latest Accident News: अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, प्रतिनिधी...

Lakhani Accident News: दुचाकी आणि रुग्णवाहिकेत भीषण अपघात झाल्याची घटना भंडाऱ्यामध्ये घडली आहे. समोरासमोर झालेल्या या जोरदार धडकेत सात जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. लाखनी तालुक्यात हा अपघात घडला असून सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Bhandara Ambulance Accident)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, भंडाऱ्याच्या (Bhandara) लाखनी तालुक्यातील गडेगाव डेपोजवळ भरधाव दुचाकी आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार रुग्णवाहिका बालाघाटवरून नागपूरला रुग्ण घेऊन जात होती. यावेळी गडेगाव डेपोजवळ आल्यानंतर या रुग्णवाहिका आणि नागपूरकडून (Nagpur) येणाऱ्या दुचाकीमध्ये समोरा समोर धडक झाली. या धडकेत रुग्णवाहिकेतील चार जण किरकोळ तर दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. (Accident News)

ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला तर रुग्णवाहिकेचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातानंतर काहीकाळ वाहनांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळित केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT