Bhandara News saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: धूलिवंदनाच्या दिवशी काळाचा घाला! तलावात पोहायला गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

Chandrakant Jagtap

>> अभिजीत घोरमारे, भंडारा

Bhandara News: धूलिवंदनाच्या दिवशी गावाशेजारील तलावावर पोहायला गेलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. चैतन्य राजेश मुटकुरे असे मृत मुलाचे नाव आहे. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे लाखनी तालुक्यातील लाखोरी गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत चैतन्य मुटकुरे हा उज्वल विद्यालयात 10वी वर्गात शिक्षण घेत होता. धूलिवंदन खेळून झाल्यानतंर गावातील चार ते पाच मित्रांसोबत तो गावाजवळ असलेल्या तलावात अंघोळीसाठी गेला होता. चैतन्य हा त्याचा मित्र नमन सुधीर चेटूले आणि इतर चार मित्रांसह पाण्यात उतरला.

परंतु चैतन्यला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला. पोहायला येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चैतन्य हा पाण्यात बुडू लागला. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना चैतन्यला वाचविण्यात यश आले नाही.

या घटनेची माहिती गावात कळताच लोकांनी तलावाजवळ एकच गर्दी केली. गावकऱ्यांनी चैतन्यचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि पोलिसांना देखील या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि मृतहाचा शोध सुरू केला. यानंतर काही तासाच चैतन्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. (Latest Marathi News)

चैतन्य हा सर्वांचा लाड़का असल्याने कुटूंबियांनी एकच हंबरळा फोडला. धूलिवंदनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान चैतन्यचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी लाखनी येथे पाठविण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT