Bhandara Zp Saam tv
महाराष्ट्र

Zp School: शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसा नसल्याने शाळा होणार बंद; दिवाळीनंतर ३२ शाळांना कुलूप?

Bhandara News : शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसा नसल्याने शाळा होणार बंद; दिवाळीनंतर ३२ शाळांना कुलूप?

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: जिल्हा परिषद शाळांमध्ये एकत्र विद्यार्थी पटसंख्या कमी असते. तर काही ठिकाणी शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शाळा सुरु ठेवण्याबाबत प्रश्न असतो. परंतु तासिका शिक्षकांना पगार देण्यासाठी (Zilha Parishad) जिल्हा परिषदकडे पैसा नाही. यामुळे भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील ३२ शाळा दिवाळीनंतर बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३२ माध्यमिक शाळा दिवाळीनंतर बंद होणार आहेत. त्याचे कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या (Zp School) शिक्षण विभागाने ७२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र हे ७२ लाख रूपये दिवाळीपर्यंत तासिका शिक्षकांचा पगार देऊ शकतात. त्यानंतर तासिका शिक्षकांना पैसे देता येणार नाही. 

राज्य सरकारकडे पत्रव्यवहार 

राज्य सरकारला जिल्हा परिषदेमार्फत अनेकदा पत्र व्यवहार करण्यात आले. पण राज्य सरकार गंभीर नाही. त्यामुळे आता भंडारा जिल्ह्यातील ३२ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दूसरीकडे तासिका शिक्षकांना पगारच मिळणार नाही. मग हे शिक्षक शिक्षणं कसे देणार? आता राज्य सरकारच्या चुकीमुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्याचा भवितव्य धोक्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

दुर्दैवी! वासरासाठी गोठ्यात धावत गेली अन् घात झाला, मायलेकाचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात हळहळ

प्रसिद्ध गायिका राजकीय रिंगणात उतरणार? भाजपच्या विनोद तावडेंची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

Konkan Tourism : 'हा सागरी किनारा'; कोकणात गेल्यावर 'या' बीचवर मारा फेरफटका

Bigg Boss 19 : किचनमध्ये गेला अन्...; अमाल मलिकचा घाणेरडेपणा पाहून नेटकऱ्यांना राग अनावर- VIDEO

SCROLL FOR NEXT