Bhandara Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Heavy Rain : आसगावला पाण्याचा वेढा; पवनी, लाखांदूर तालुक्याचा संपर्क तुटला

Bhandara News : विदर्भातील नागपूर, चंद्रपूरसह सांगली जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. तर हवामान विभागाकडून भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे तालुक्यातील बहुतांश परिसर जलमय झाला आहे. दरम्यान पवनी व लाखांदूर तालुक्यांचा संपर्क तुटला असून पवनी तालुक्यातील आसगावला पुराच्या पाण्याने वेढा पडला आहे. यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

विदर्भातील नागपूर, चंद्रपूरसह सांगली जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. तर हवामान विभागाकडून भंडारा (Bhandara) जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. तर पवनी, लाखांदूर तालुक्यांना रात्रीपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सकाळपासून देखील पावसाची संततधार (Heavy Rain) सुरूच आहे. यामुळे अनेक सखल भागात तसेच रस्त्यांवर देखील पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

पवनी तालुक्यांतील चार हजार जनसंख्या असलेल्या आसगाव या गावाला पाण्याने वेढा दिला असुन संपूर्ण गाव पाण्याखाली आले आहे. परिणामी नागरिकांना घराच्या बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. तर रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने पवनी व (Lakhandur) लाखांदूर या दोन तालुक्याचा संपर्क तुटला आहे. तर नागरिकांनी पिण्याचा पाण्याची देखील बाहेरून व्यवस्था केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दहीहंडी उत्सवादरम्यान एका गोविंदाचा मृत्यू

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का, ठाकरेंच्या पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश

Gautami Patil Video: सबसे कातील गौतमी पाटील! स्टेजवर पाय ठेवताच गोविंदांचा एकच जल्लोष; जबरदस्त ठुमके एकदा बघाच

Dog Lovers: पुण्यात श्वानप्रेमींचा संताप उसळला; कोर्टाच्या आदेशाविरोधात रस्त्यावर आंदोलन|VIDEO

Minio Green: भारतीय बाजारात धडकणार नॅनोपेक्षा लहान मिनी इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या दमदार फिचर्स

SCROLL FOR NEXT