Crime News saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! दारूचे व्यसन सुटत नाही म्हणून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

रोशन भाऊराव टेकाम (वय 34) रा. टिळक वॉर्ड, गांधी चौक भंडारा असे मृताचे नाव आहे.

अभिजित घोरमारे

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूचे व्यसन सुटत नाही म्हणून एका तरुणाने वैनगंगा नदीत उडी घेऊन आयुष्याचा शेवट केला. सदरील घटना शुक्रवारी भंडारा शहरालगत कारधा येथील वैनगंगा नदीपात्रात घडली आहे. रोशन भाऊराव टेकाम (वय 34) रा. टिळक वॉर्ड, गांधी चौक भंडारा असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे दारू सोडविण्यासाठी रोशनला व्यसनमुक्ती केंद्रातही ठेवण्यात आले होते. (Bhandara Latest Crime News)

माहितीनुसार, मागील काही वर्षांपासून रोशनला दारूची सवय लागली होती. रोशनने दारू सोडावी म्हणून त्याचे कुटुंबीय त्याला आग्रह करत होते. इतकंच नाही तर, दारू सुटावी म्हणून कुटुंबीयांनी संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात 40 दिवस ठेवलं होतं. व्यसनमुक्ती केंद्रातून आल्यानंतर रोशनवर घरी उपचार सुरू झाले.

दरम्यानच्या काळात त्याची दारू बंद झाली होती, मात्र दोन महिन्यांपूर्वी रोशनने दारू सोडण्याच्या गोळ्या घेणे बंद करून पुन्हा दारू प्राशनास सुरुवात केली. यामुळे त्याची मानसिक स्थिती पुन्हा बिघडली. आणि त्यातच त्याला नैराश्य आलं. दरम्यान, शुक्रवारी रोशन हा घरातून कुणालाही काही न सांगता बाहेर पडला.

बराच वेळ होऊन सुद्धा तो घरी न आल्याने कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याचा शोध घेतला. दरम्यान, रोशनचा मृतदेह शहरालगतच्या कारधा येथील वैनगंगा नदीपात्रात आढळून आला. या घटनेने टेकाम कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती भंडारा ठाण्यात देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

Local Body Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, ठाकरे अन् शिंदेंचे शिलेदार फोडले

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

SCROLL FOR NEXT