Bhandara Crime News, Bhandara Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

काय सांगता? चोरट्याने लांबविला चक्क रोडरोलर; एकास अटक

काही दिवस पाळत ठेवून गिरीराज याने रोलर चोरण्याचा बेत आखला.

अभिजित घोरमारे

भंडारा : पैशाच्या हव्यासापोटी आजकाल कोण काय करेल याची खात्री नाही. भंडाऱ्यातील कारधा पोलीस स्टेशन हद्दीतून एका चोरट्याने चक्क रोडरोलरच लांबविला होता. या चोरट्याला पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या आहेत. गिरीराज उर्फ पप्पू दाजीबा तवाडे (वय ३०) रा. सानगडी ता. साकोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Bhandara Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील जानेवारी महिन्यात करचखेडा येथे रस्त्याचे काम सुरू होते. या कामावर भंडारा शहरातील पटेलपुरा वार्डातील मनीष चुटे यांचा रोड रोलर होता. काम बंद झाल्यानंतर सदर रोलर रस्त्यालगत उभा असल्याचे बघून आरोपी गिरीराज याने संधी साधली.

काही दिवस त्यावर पाळत ठेवून गिरीराज याने रोलर चोरण्याचा बेत आखला. गिरीराज याने तुमसर येथील क्रेन बोलावत, लाखनी येथून एकाचा ट्रक बोलाविला. क्रेनच्या मदतीने दीड लाख रुपये किमतीचा रोड रोलर उचलून ट्रकमध्ये ठेवून तो नागपूरला नेऊन तिथे विकला. याप्रकरणी तक्रार नोंद झाल्याने कारधा पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

Mug Cleaning Tips: बाथरुममध्ये वापरला जाणारा मग किती दिवसांनी बदलावा? डाग काढण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT