Bhandara Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Bhandara News : सकाळी फिरायला गेलेल्या तरुणांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर वरठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढत ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: वरठी येथील पडोळे भोजनालयात कामाला असलेल्या एका कामगाराचा मृतदेह नदीत आढळून आला होता. पोलिसांनी याचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात कामगाराने मालकाला अपशब्द बोलल्याने चाकूने भोसकून कामगाराची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील वरठी येथे हि धक्कादायक घटना घडली असून गोपाल बावनकर (वय 40, मूळ राहणार अर्जुनी, तिरोडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान गोपाल याचा मृतदेह दाभा येथील सूर्य नदीपात्रात तरंगताना आढळून आला. सकाळी फिरायला गेलेल्या तरुणांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर वरठी पोलिसांनी (Police) घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढत ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

दरम्यान सदर व्यक्तीची ओळख पटली असून तो वरठी येथील पडोळे भोजनालयात कामाला होता. व्यसनाच्या भरात त्याने मालकाला (Crime News) अपशब्द बोलण्याच्या कारणावरून मालकाने चाकू भोसकून त्याची हत्या केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या दरम्यान त्याचा मृतदेह चारचाकी वाहनाच्या डिक्कीत घालून दाभा परिसरातील सुर नदी पात्रात फेकण्यात आला. दरम्यान यावेळी त्याच्यासोबत आणखीन सहकारी असल्याच्या संशय असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर पुढील तपास व कारवाई वरठी पोलीस करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

SCROLL FOR NEXT