Bhandara Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime: पुर्व वैमनस्यातून बांधकाम ठेकेदाराची भर दुपारी हत्या

पुर्व वैमनस्यातून बांधकाम ठेकेदाराची भर दुपारी हत्या

अभिजीत घोरमारे

भंडारा : जुन्या वैमनस्यातून फावड्याने वार करत बांधकाम ठेकेदाराची दिवसाढवळ्या हत्या केल्याची घटना भंडारा शहरातील मेंढा येथील चर्च रोडवरील नाल्यावर घडली. याप्रकरणी भंडारा (Bhandara) शहर पोलिसांनी (Police) दोन आरोपींना अटक केली असून दोन फरार आरोपीचा शोध सुरु आहे. (Bhandara Crime News)

ओमप्रकाश मेश्राम (वय 40) असे मृतक ठेकेदारांचे नाव असून ओमप्रकाश याच्या (Crime) हत्येप्रकरणी क्रिष्णा चापरे (वय 24), राकेश मंदुरकर (वय 25) या आरोपींना अटक केली आहे. यात दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. मृतक ओमप्रकाश यांचे आरोपीसोबत जुन्या एका कारणाने (Bhandara Crime) वाद सुरु होता. दोघेही एकमेकांना पाण्यात बघत होते. दरम्यान आज दुपारी मृतक आपल्या मेंढा येथील बांधकाम साइडवर व्यस्त असताना आरोपी क्रिष्णा आणि राकेश आपल्या दोन मित्रांसोबत आला.

भांडण सुरू करत फावड्याने हल्‍ला

त्यांनी ओमप्रकाश सोबत भांडण सुरू केले. यात वाद इतका विकोला गेला की क्रिष्णा आणि राकेशने बांधकामात वापर होणाऱ्या फावड्याने ओमप्रकाश यांच्‍यावर वार करून फरार झाले. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या ओमप्रकाश यांना लागलीच त्याच्या कामावरील मजूरांनी दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याची माहिती भंडारा शहर पोलिसांना होताच त्यांनी हत्येचा गुन्हा नोंद करत तपास चक्रे फिरवत दोन आरोपिला अटक केली असून अद्याप 2 फरार आरोपीचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT