सम्यक मनोज मेश्राम  SaamTvNews
महाराष्ट्र

Bhandara : पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार हत्याराने वार करून हत्या!

गुप्ती, तलवार व रॉडच्या सहाय्याने सम्यकचा खून

अभिजित घोरमारे

भंडारा : पूर्ववैमनस्यातून 35 वर्षीय युवकाची 4 ते 5 आरोपींनी धारधार शस्त्राने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या कारधा (Kardha) पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आमगावात घडली आहे. सम्यक मनोज मेश्राम (वय 35) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून सचिन ऊके (वय 30) वर्ष असे पोलिसांच्या हाती लागलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सचिनने कारधा पोलिसांना शरण आला असून अन्य आरोपी फरार असून कारधा पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हे देखील पाहा :

मृत सम्यक याचा आरोपी सचिनशी एका जुन्या विषयामुळे वाद सुरु होता. या वादातून त्यांचे अनेकदा खटकेही उडाले होते. अखेर त्यांच्यातील हा वाद विकोपाला जाऊन सचिन ने सम्यक मेश्राम याला संपवण्याचा कट रचला. आज संध्याकाळी मोटारसायकलवर घरी निघालेल्या सम्यक मेश्रामला एकटे गाठून आरोपी सचिन ऊके व त्याच्या अन्य साथीदारांनी गुप्ती, तलवार व रॉडच्या सहाय्याने सम्यकचा खून (Murder) केला.

घटनेनंतर सर्व आरोपी सुरुवातीला फरार झाले होते. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन ऊके कारधा पोलिसांना शरण आला. कारधा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी सचिन ऊके विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करत त्याला अटक केली असून अन्य फरार आरोपींचा शोध सुरु आहे. आमगावात (Amgaon murder Bhandara) घडलेल्या या घटनेने गावात दहशतीचे वारावरण पसरले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Shocking: आई-बापाने काबाड कष्ट करत म्हशी घ्यायला पै पै जमवली, मुलानं 'फ्री फायर' गेमसाठी ५ लाख उडवले

GK: भारतातील सर्वात लहान दोन अक्षरांचे नाव असलेले रेल्वे स्टेशन कोणते?

ITR Filling 2025: तुमच्या उत्पन्नानुसार निवडा आयटीआर फॉर्म! कोणासाठी कोणता फॉर्म योग्य? वाचा सविस्तर

Ranveer Singh : 'धुरंधर'चा जबरदस्त टीझर, रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री कोण? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT