Bhandara Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident : भजनी मंडळ नेणारा टेम्पो पुलावरून कोसळला; दोन मुली पुरात गेल्या वाहून, १३ जण सुखरूप

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या खांबा ते वडेगाव या मार्गावर पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : भजनी मंडळीला घेऊन मार्गस्थ झालेल्या टेम्पोला अपघात झाला आहे. नाल्यावरील पुलावरून हा टेम्पो कोसळल्याने यात बसलेल्या दोन लहान मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. दरम्यान या अपघातात १३ जण सुखरूप बाहेर निघाले. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील खांबा वडेगाव दरम्यान हा अपघात झाला आहे. 

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या खांबा ते वडेगाव या मार्गावर पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. पहाटे पाच वाजेच्या सुमारास भजनी मंडळीं एका टेम्पोतून गावाकडे मार्गस्थ झाले होते. दरम्यान गावापासून काही अंतरावर गेले असता नाल्यावरील पुलावरून हा टेम्पो पाण्यात (Accident) कोसळला. या अपघातात टेम्पोमधील १५ ही जण नाल्याच्या पाण्यात कोसळलेत. यामध्ये असलेल्या दोन वर्षीय आणि पाच वर्षीय अशा दोन मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. तर 13 जण पाण्याच्या बाहेर निघाले. 

त्या मुलींचा शोध सुरु 

अपघातात १३ ही जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती होताच साकोली तहसीलदार निलेश कदम हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जेसीबी आणून नाल्यात पडलेला टेम्पो बाहेर काढून एसडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मुलींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: साखरेच्या दरात 18 दिवसात 18 रुपयांची वाढ; दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT