Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : पाणी पिण्यासाठी दुचाकी थांबविताच झाला घात; भरधाव ट्रकने चिरडले, दुचाकीस्वाराचे दोन्ही पाय निकामी

Bhandara News : काटेबाम्हणी येथील टाकला फाट्याजवळ रस्त्यावर मोटारसायकल उभी करून पाणी पिण्याकरीता समोरच्या सायकल स्टोअर दुकानाजवळ गेले होते पाणी पिऊन मोटारसायकलकडे परत जात असतांना ट्रकने धडक देत उडविले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: तुमसर- रामटेक मार्गावरील काटेबाम्हणी गावाजवळ एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. त्यात दुचाकीस्वाराच्या पायावरुन ट्रकचे चाक गेल्याने दोन्ही पायांचा चंदामेंदा होऊन निकामी झाले. सुदैवाने अपघातात सदर दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे. जखमी दुचाकीस्वारावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

भंडारा जिल्ह्यातील उसर्रा येथील दिलीप मोहन आगरे (वय ४५) असे अपघातात जखमीचे नाव असून त्याला उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले आहे. जखमी दिलीप आगरे हे उसर्रा येथून सुंदरटोला येथे जाण्यासाठी निघाले होते. याचवेळी काटेबाम्हणी येथील टाकला फाट्याजवळ रस्त्यावर मोटारसायकल उभी करून पाणी पिण्याकरीता समोरच्या सायकल स्टोअर दुकानाजवळ गेले होते. 

रस्ता ओलांडत असताना ट्रकने उडविले 

पाणी पिऊन मोटारसायकलकडे परत जात असतांना खाप्याकडून टाकला गावाकडे भरधाव जाणाऱ्या ट्रक चालकाने रस्ता ओलांडत असलेल्या दिलीप आगरे याला धडक देत चिरडले. त्यात दिलीप आगरे याच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा होऊन निकामी झाले. ट्रकचा चालक संजय कुकडे याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असून सुदैवाने दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे. 

जखमींची प्रकृती चिंताजनक 

दरम्यान अपघाताची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे पाठविण्यात आले. मात्र जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले. तर तक्रारीवरुन तुमसर पोलिसात आरोपी ट्रकचालक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT