Bhandara Accident News Saam TV
महाराष्ट्र

Bhandara Accident News: भरधाव कारने दुचाकीसह रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला उडवलं; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Bhandara Car Bike Accident: भरधाव वेगात असणाऱ्या कारने दुचाकीस्वारासह पायी जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार युवक आणि महिला हे दोघेही जागीच ठार झाले

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख, साम टीव्ही

Bhandara Accident News: भरधाव वेगात असणाऱ्या कारने दुचाकीस्वारासह पायी जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार युवक आणि महिला हे दोघेही जागीच ठार झाले, तर गंभीररित्या जखमी झालेल्या तरूणाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील पवनी रस्त्यावरील कोंढा परिसरातील चर्चसमोर घडली.

दीपक मंगल जुमळे (वय 24), सुमन नामदेव बावनकर (वय 55), रोहित यादव (वय 28), अशी मृतांची नावे असून तिघेही कोंढा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पेरणीचा हंगाम सुरू असल्याने दीपक जुमळे आणि रोहित यादव हे दोघेही दुचाकीने शेतावर गेले होते.

तर सुमन बावनकर ही महिला सुद्धा शेतातील पेरणीचे काम आटोपून घरी परतत होती. दरम्यान, पवनीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला तसेच पायी जाणाऱ्या महिलेलासुद्धा कोंढा येथील चर्च समोरच्या रस्त्यावर जोरदार धडक (Accident News) दिली.

ही धडक इतकी भीषण होती, दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या शेतात जाऊन कोसळली. या भयानक घटनेत दीपक जुमळे आणि सुमन बावनकर, हे दोघेही जागीच ठार झाले. रोहित यादव हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने भंडारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, उपचार सुरू असताना त्याचा देखील मृत्यू झाला. अपघातनंतर कारचालक हा घटनास्थळावरून पसार झाला होता. तो पालंदर येथील रहिवाशी असून त्याला सुद्धा घटनेत दुखापत झाली आहे. सध्या कारचालक भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असून याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Chip Cookies: लहान मुलांसाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी चॉकलेट चिप कुकीज, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माघ पौर्णिमा निमित्ताने पुण्याच्या खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा मंदिरात भाविकांची मांदियाळी

Chocolate Pudding Recipe : नो शुगर, नो बेकिंग; घरीच १० मिनिटांत बनवा चॉकलेट पुडिंग, बच्चे कंपनी होईल खुश

Valentine Day Gifts: गर्लफ्रेंड किंवा बायकोला करा खूश; या व्हॅलेंटाईन डेला द्या 'हे' खास गिफ्ट्स

Hair Color Care: केसांना लावलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT