Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara : लॉजमध्ये चालविला जात होता वेश्याव्यवसाय; पोलिसांच्या छापेमारीत पर्दाफाश, दोन आरोपींना अटक

Bhandara News : पवनी तालुक्यातील इटगाव- कुर्झा रोडवर दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई करत लॉजवर सुरु असलेल्या अवैध वैश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: लॉजवर अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालविला जात होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने याठिकाणी छापेमारी करत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी पोलिस ठाणे परिसरात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

भंडारा जिल्हा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. पवनी पोलीस ठाणे परिसरात असलेल्या एका लॉजवर अवैधपणे वैश्य व्यवसाय चालविला जात होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत हि कारवाई केली आहे. याठिकाणाहून अटक करण्यात आलेल्या दोघं आरोपींमध्ये अजय नागेश्वर (वय २६, बेलाटी, ता. लाखांदूर) आणि लॉज मालक व्यंकटेश बागडे (४४, साकोली) यांचा समावेश आहे.

अकोट शहरात देहविक्रीचा पर्दाफाश 

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात सुरु असलेल्या देहविक्री व्यवसायावर अकोला पोलिसांनी कारवाई केली. अकोट शहरातील मच्छी मार्केटमधील आठवडी बाजार परिसरात हा देह व्यवसाय सुरु होता. मिनाबाई पागृत ही महिला ताडपत्रीचे छोटे रूम उभारून देह व्यापाराचा व्यवसाय चालवत होती. या ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केली असता पाच महिला देहविक्री करताना दिसून आल्या. 

जिल्हा बाहेरून येत होत्या महिला 

जिल्हा बाहेरून महिला आणि तरुणांना आणून ग्राहकांना इथे उपलब्ध करून देण्यात येत होते. दरम्यान आज अकोला पोलिसांच्या स्थानिक पुणे शाखेने या ठिकाणी कारवाई करून हा संपूर्ण देह विक्रीचा व्यवसाय उघड केला. याठिकाणी पोलिसांनी दोन ग्राहकांसह पाच महिलांना ताब्यात घेत तरुणींची सुटका केली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Rain : गेवराई तालुक्यात ऊस पिकाचे अतोनात नुकसान; मदत वाढवून देण्याची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकसाठी बंद, हत्तूर पूल पूर्णतः पाण्याखाली गेला

Cholesterol Control Tips: गोळ्या, औषधं घ्यायची गरजच नाही! ५ उपाय करतील कोलेस्ट्रॉल कमी, तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

Kanya Pujan 2025: नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या दिवशी कन्या पूजा का करतात?

'या' चुकांमुळे तुमच्या मोबाईलचा कधीही होऊ शकतो स्फोट

SCROLL FOR NEXT