Bees Attack On Women Saam TV
महाराष्ट्र

Bees Attack On Women: मधमाशांच्या हल्ल्यात ६ महिला मजूर गंभीर जखमी; भंडारा जिल्ह्यात नागरिकांमध्ये घबराट

Bhandara News: खरीप हंगाम संपताच या शेतात मुग पिकाची लागवड करण्यात आली. सध्या मुग पीक कापणीला आलं असल्याने सरिता यांनी गावातीलच काही महिला मजुरांना मुगाची काढणी करण्यासाठी ठेक्याने केलेल्या शेतात घेऊन गेल्या होत्या.

Ruchika Jadhav

शुभम देशमुख

Bhandara:

रब्बीतील पिकांची काढणी करण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर मधमाशांनी हल्ला चढवला आहे. या घटनेत ६ महिला मजूर गंभीररित्या जखमी झाल्यात. ही घटना आज भंडारा जिल्ह्याच्या तालुक्यातील डांभेविरली शेत शिवारात घडली आहे. सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडालीये.

सरीता रामाजी राऊत (५५), कान्होपाञा राकेश राऊत (२६), वनिता हिरालाल शहारे (४०), किरण हिरालाल शहारे (१८), देविका सोमा शहारे (५०) व लता होमराज बुराडे (४०)सर्व राहणार डांभेविरली असे मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी महिला मजुरांची नावे आहेत.

रामाजी राऊत यांनी दिपक आनंदिकर यांची ३ एकर शेतजमीन ठेक्याने केली आहे. खरीप हंगाम संपताच या शेतात मुग पिकाची लागवड करण्यात आली. सध्या मुग पीक कापणीला आलं असल्याने सरिता यांनी गावातीलच काही महिला मजुरांना मुगाची काढणी करण्यासाठी ठेक्याने केलेल्या शेतात घेऊन गेल्या होत्या.

मात्र शेतात पिकांची काढणी करत असताना अचानक मधमाशांनी महिला मजुरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात 6 महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT