beed, nurse, zill parishad ceo saam tv
महाराष्ट्र

लसीकरणाच्या कामात हलगर्जीपणा करणा-या नर्सला निलंबनाचं इंजेक्शन

या कारवाईने कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

विनोद जिरे

बीड : लसीकरण (vaccination) योजनेसाठी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याने तसेच कामचुकारपणा केल्याने येथील (beed) जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका नर्सला (nurse) निलंबित केले आहे. या कारवाईने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. (beed latest marathi news)

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार (Ajit Pawar) यांनी संबंधित नर्सवर निलंबनाची कारवाई केली आहे. पी.एस. गोरडे असे निलंबित केलेल्या नर्सचे नाव आहे. त्या शिरूर कासार आरोग्य उपकेंद्रात कर्तव्यावर होत्या.

कोरोना (Corona) काळात गाेरडे यांना शिरूर तालुक्यात नियुक्ती दिली होती. मात्र त्या ठिकाणी देखील कामचुकारपणा केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला हाेता. गाेरडे यांची चौकशी लावण्यात आली हाेती. या चाैकशीनंतर त्यांचे निलंबन करण्याच्या सूचना सीईओ पवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या हाेत्या. त्याप्रमाणे गाेरडे यांच्यावर कारवाई झाली आहे. या कारवाईने कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Air Pollution : वायू प्रदुषणामुळे पाकिस्तानात आणीबाणी, तब्बल 20 लाख लोकांची प्रकृती बिघडली, लाहोरमधला आकडा धक्कादायक

Screenshot ला मराठीत काय म्हणतात? ९९ टक्के लोकांना माहिती नसेल उत्तर

KVP Yojana: खुशखबर! या योजनेत गुंतवलेले पैसे होणार डबल, गुंतवणूदारांना फायदाच फायदा; योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

VIDEO : मोदींना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे, राहुल गांधींचा हल्लाबोल | Marathi News

Mumbai Local Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष असूद्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहून पडा घराबाहेर

SCROLL FOR NEXT