Beed News Saam
महाराष्ट्र

"पैसे दे, नाहीतर शारीरिक संबंध ठेव", नकार देताच प्रायव्हेट फोटो व्हायरल; महिला विष प्यायली अन् मग..| Beed News

Contractor Abuses Woman Threatens to Kill Husband: ऊसतोडीसाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या एका मजूर महिलेवर मुकादमाने वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. कंटाळून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

Bhagyashree Kamble

बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ऊसतोडीसाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या एका मजूर महिलेवर मुकादमाने वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला आहे. "ऊसतोडीची असलेली रक्कम दे किंवा शारीरिक संबंध ठेव. नसेल तर, तुझ्या पतीला मारून टाकेन", अशा धमक्या देत आरोपीने महिलेवर २ वर्ष लैंगिक अत्याचार केला. नंतर त्याने पीडित महिलेचे खासगी फोटोही सोशल मीडियात व्हायरल केले.

याच अत्याचाराला कंटाळून पीडितेने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

बीडमधील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात ऊसतोड मजूर जोडपे अमोल श्रीमंत शिनगारे याच्याकडे कामाला होते. २ वर्षांपूर्वी त्याने ऊसतोड कामगार महिलेला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. "ऊसतोडीची असलेली रक्कम दे किंवा शारीरिक संबंध ठेव" अशी धमकी देत नराधमाने महिलेवर लैेंगिक अत्याचार केला. तसेच महिलेचे काही नग्न अवस्थेतील फोटोही काढले.

"भेटायला आली नाहीस तर, तुझे फोटो व्हायरल करेन", अशी धमकीही त्याने दिली होती. दोन ते तीन वर्ष हे प्रकरण सुरूच होतं. सात महिन्यांपासून महिलेने नराधमाला भेटण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर नराधमानं तिचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियात व्हायरल केले.

पीडित महिलेला या गोष्टीचा जबरदस्त धक्का बसला. विष प्राशन करून तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नंतर पीडितेला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

महिलेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिने थेट नराधमविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

नीलम गोऱ्हेंचं एसपींना निर्देश

बीडमधील या धक्कादायक बातमीची दखल विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. तसेच पोलीस अधिक्षक काँवत यांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT