Beed Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Beed Water Crisis: बीडच्या मनकर्णिका प्रकल्पात अवघा १५ टक्के पाणीसाठा शिल्लक; ४० गावांवर ओढावणार पाणी टंचाईचे संकट

Maharashtra Breaking News: बीडच्या मनकर्णिका प्रकल्पांतील पाण्याने तळ गाठला असून अवघा 15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात 40 गावच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

विनोद जिरे

Beed Water Crisis News:

यंदा पाऊस कमी झाल्याने राज्यातील अनेक भागामध्ये दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. बीडमध्येही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. बीडच्या मनकर्णिका प्रकल्पांतील पाण्याने तळ गाठला असून अवघा 15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात 40 गावच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या (Beed) पिंपळनेर येथील मनकर्णिका प्रकल्पाने मार्चच्या मध्यातच तळ गाठला आहे. या प्रकल्पावर जवळपासच्या 40 गावच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. याबरोबरच शेती सिंचनासाठी ही या तलावातील पाण्याचा उपयोग होतो. परंतु यावर्षी बीड जिल्ह्यात अतिशय कमी पाऊस झाल्याने या प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा झाला होता.

आता उन्हाचा कडाका जसजसा वाढतोय तसा पाणीसाठा देखील घटत असून सध्या या प्रकल्पात अवघा 15 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या पाणीपुरवठ्याचे नियोजन होत असले तरी येत्या काही दिवसात हे पाणी पुरेसे ठरणार नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर या गावच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर नियोजन देखील करण्यात येत असले तरी ग्रामस्थांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दरम्यान, आता यावर प्रशासन काय मार्ग काढणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT