Beed Crime Saam
महाराष्ट्र

Beed Crime: 'ये पाया पड नाहीतर..' मुंडे टोळीने तरूणाला बेल्टनं झोडलं, नंतर नाक घासून पाया पडायला लावलं

New Video Emerges of Beed Incident: बीडच्या एका युवकावर समाधान मुंडे आणि त्याच्या टोळीने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Bhagyashree Kamble

गुन्हेगारीच्या घटनेमुळे बीड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. एका युवकावर समाधान मुंडे आणि त्याच्या टोळीने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करण्यात आलेल्या तरूणाला पाया पडायला लावल्याचं दृश्य आहे. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील जलालपूर परिसरात घडली असून, या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ७ आरोपींना अटक केली आहे. तर, उर्वरित तीन ते चार आरोपींचा शोध सुरू आहे.

शिवराज दिवटे असे मारहाण करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. १६ मे रोजी तरूणाचे अपहरण करून त्याला एका निर्जनस्थळी नेण्यात आले. त्यानंतर तरूणावर ८-९ जणांनी मिळून लाठ्या, काठ्या, बेल्टने अमानुष मारहाण केली. अमानुष मारहाण करत असताना काहींनी व्हिडिओ शूट केला आणि समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल होताच हे प्रकरण समोर आलं.

यासंदर्भात आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात निर्दयी टोळीने व्हिडिओ शूट करत त्याला सर्व आरोपींच्या पाया पडायला लावल्याचे दृश्य आहे. एक एक करून आरोपी पाया पडायला लावत असून, लाथा देखील घालत आहेत. या अमानुष कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होताच सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे.

पोलिसांची कारवाई

या घटनेची गंभीर दखल घेत बीड पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरूवात केली आहे. बीड पोलीस अधिक्षकांनी गुन्हा दाखल केला असून, सात आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर, उर्वरित तीन ते चार जणांचा शोध सुरू आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कायदा - सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या प्रकारामुळे बीड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, स्थानिक प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh - Raja Shivaji Trailer : आई भवानीच्या नावानं चांगभलं! डोळ्यात पाणी अन् छातीत अभिमान, रितेशच्या ‘राजा शिवाजी’चा जबरदस्त ट्रेलर| VIDEO

Maharashtra Politics: शिवसेनेच्या आमदाराने शिंदेंच्या विरोधातच दंड थोपटलं, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Tanvi Kolte Net Worth: बिग बॉस विजेती तन्वी कोलतेची एकूण संपत्ती किती? कशी कमावते इतका पैसा? जाणून घ्या

Hingoli: सरकारी कर्मचाऱ्याकडून अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव, तरुणाने संपवलं आयुष्य; हिंगोलीत खळबळ

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, इंजिनिअरने २ दुचाकींना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू, पती-पत्नी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT