beed news saam
महाराष्ट्र

Beed: 'गुन्हेगाराला जात...', शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट, विचारपूस करत म्हणाले..

Former Minister Dhananjay Munde Meets Victim: परळीतील शिवराज दिवटे याच्यावर एका टोळीने अमानुष मारहाण केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी जखमी तरूणाची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली.

Bhagyashree Kamble

बीड सध्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत आहे. शुक्रवारी परळी तालुक्यातील लिंबोटा गावात एका तरूणाला मुंडे टोळीने काठी, बेल्ट, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आधी अपहरण करून डोंगरावर नेलं, नंतर ८ ते १० जणांनी मिळून शिवराज दिवटे या युवकाला मारहाण करत पाया पडायला लावलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी युवकाची भेट घेतली. नंकर माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवटेची रूग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली आहे.

शिवराज दिवटेला झालेल्या मारहाणीनंतर बीड पुन्हा एकदा पेटून उठलं. दिवटे सध्या गंभीर जखमी असून, त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी खासदार बजरंग सोनवणे, आंदोलनकर्ते मनोज जरांगे, माजी आमदार दीपक केदार, आणि परळीचे आमदार तथा माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवटे या युवकाची रुग्णालयात भेट घेतली.

भेट घेत त्यांनी युवकाची विचारपूस केली. तसेच आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली. धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घटनेचा तीव्र निषेध केला. या घटनेसंदर्भात मुंडे म्हणाले, 'गुन्हेगाराला जात नसते, या घटनेला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न काही जण प्रयत्न करीत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे की हा वाद जातीय किंवा धार्मिक कारणामुळे नाही. तपासातून खरी कारणं लवकरच समोर येतील', असं मुंडे म्हणाले.

"शिवराज दिवटे यांच्यावर क्रूरपणे हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी यावेळी प्रशासनाकडे केली. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

HPV विषाणूमुळे होऊ शकतो घशाचा कॅन्सर; रुग्णांमध्ये कोणती लक्षणे दिसतात

Sunday Horoscope : जोडीदार साथ देणार, ५ राशींच्या व्यक्तीचा यशाचा मार्ग खुला होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Aamir Khan Wedding: 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या घरी लग्नाची लगबग; आमीर खान 2 आठवड्यात विवाह बंधनात अडकणार

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT