VILAS GHULE MURDER CASE: RAPE FIR REGISTERED AGAINST UMESH MANE IN BEED  Saam Tv
महाराष्ट्र

Beed : विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, उमेश मानेवर बलात्काराचा गुन्हा; विवाहित महिलेशी जबरदस्ती संबंध ठेवले अन्...

Vilas Ghule Murder Case Update News : बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. विवाहित महिलेच्या तक्रारीनंतर उमेश मानेविरोधात केज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात उमेश मानेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

  • विवाहित महिलेने जबरदस्ती, धमक्या आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप केले

  • २० जून रोजी झालेल्या वादानंतर विलास घुले यांच्यावर हल्ला होऊन मृत्यू

  • केज पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आली असून पिंक पथकाकडून तपास सुरू

योगेश काशीद, बीड

बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या उमेश मानेविरोधात अखेर केज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी पूर्ण करून गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान आता या प्रकरणाला कोणते नवे वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

नेमकं प्रकरण काय ?

मृत विलास घुलेचा मित्र उमेश माने याचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. संबंधित महिलेवर उमेश वारंवार बळजबरी करत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. अत्याचारानंतर ही घटना कोणालाही सांगितल्यास तिच्या मुलांना जीवे मारण्याची तसेच तिच्या पतीसमोर अनैतिक संबंध असल्याचे खोटे सांगण्याची धमकी द्यायचा. या भीतीमुळे पीडिता काही काळ गप्प राहिली होती. मात्र, उमेशने ३ जून रोजी पुन्हा ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केले. विलास घुलेने देखील या महिलेला उमेशसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकी दिली.

२० जूनच्या रात्री काय घडलं?

दरम्यान २० जूनच्या रात्री उमेश विलासच्या हॉटेलवर गेला होता. तिथेच पीडित महिलेच्या कुटुंबातील ८ ते ९ जण तिथे पोहोचले. आमच्या मुलीला का त्रास देतो असा प्रश्न विचारला आणि दोन्ही बाजूने वाद सुरु झाला. ८ ते ९ जणांच्या घोळक्याने उमेशला मारहाण करायला सुरुवात केली. हे भांडण मिटवण्यासाठी विलासने मध्यस्थी केली. यादरम्यान पीडित महिलेच्या वडिलांनी विलासवर हल्ला केला. या हल्ल्यात विलासची हत्या झाली.

उमेश मानेवर गुन्हा दाखल

एकीकडे विलास घुलेच्या कुटुंबीयांनी हा नियोजित कट रचून हत्या केल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे पीडित महिलेने आता विलास घुलेच्या मित्रावर बलात्काराचे आरोप केले आहेत. याप्रकरणी महिलेने केज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून उमेश माने विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आता कोणतं नवं वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्या या प्रकरणाचा तपास केज पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या पिंक पथकाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Maharashtra News Live Update: बनावट शालार्थ आयडी प्रकरणात १,१०० पानांचे दुसरे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Junnar Fort : जुन्नरला जात असाल तर 'हा' किल्ला पाहायला विसरू नका, इतिहास अन् निसर्गाचा अनोखा संगम अनुभवाल

'ब्लू' टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, कधी आणि कसं प्यावे जाणून घ्या

Idli Bhaji Recipe : उरलेल्या इडलीपासून बनवा कुरकुरीत भजी, घरच्यांना आवडेल ही हटके रेसिपी

SCROLL FOR NEXT