Beed Train Accident Saam Digital
महाराष्ट्र

Beed Train Accident : बीडच्या परळी शहरानजीक रेल्वे अपघात; मेंढपाळासह 22 मेंढ्या, 2 जनावरं जागीच ठार

Beed Train Accident News : बीडमधील मलकापूर येथे भरधाव वेगातील मालवाहू रेल्वेच्या धडकेत एका मेंढपाळासह 22 मेंढ्या आणि 2 जनावरं जागीच ठार झाली आहेत. परळी शहरानजीक ही घटना घडली.

Sandeep Gawade

बीडमधील मलकापूर येथे भरधाव वेगातील मालवाहू रेल्वेच्या धडकेत एका मेंढपाळासह 22 मेंढ्या आणि 2 जनावरं जागीच ठार झाली आहेत. ही दुर्दैवी घटना बीडच्या परळी शहरापासून जवळच असलेल्या मलकापूर शिवारात घडलीय. मुंजा ढोणे असं मयत मेंढपाळाचं नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, परळी शहरातील धनगर गल्ली भागातील मेंढपाळ, मधुकर सरवदे व मुंजा ढोणे या दोघांनी आज मेंढ्या चारण्यासाठी सोडल्या होत्या. यावेळी रेल्वे पटरीवरू मेंढ्या जात होत्या. यावेळी परळी-हैद्राबाद रेल्वे पटरीच्या कडेने जात असताना मलकापूर शिवारानजीक अचानक समोरून मालगाडी आली.

मात्र दोन्ही बाजूंनी डोंगर असल्यामुळे बचावासाठी वेळचं मिळाला नाही. क्षणार्धात मालगाडीने 22 मेंढ्या आणि दोन जनावरांना चिरडलं. मेंढपाळ मुंजा ढोणे यांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर मधुकर सरवदे मात्र यातून बचावले आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT