Beed : बीडमध्ये 13 तासात तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू! विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed : बीडमध्ये 13 तासात तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू!

बीडच्या पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्याच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील गोदावरी नदीमध्ये, एका तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात विविध दोन ठिकाणी घडलेल्या घटनेत, 13 तासात 3 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बीडच्या पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्याच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील गोदावरी नदीमध्ये, एका तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा :

ओंकार लक्ष्मण काळे (वय 16), शिव संतोष पिंगळे (वय 16) दोघेही रा. बीड व तान्हाजी लिंबाजी आरबड (वय 17) रा. सुरळेगाव ता. गेवराई असे त्या तिघांचे नावे आहेत. यातील ओंकार काळे आणि शिव पिंगळे हे दोघेही, पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते.

यादरम्यान ते दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना काल सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. तर, गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे सकाळी 8 च्या दरम्यान पोहण्यासाठी गेलेला, तानाजी आरबड या तरुणाचा देखील, गोदावरी नदीच्या डोहामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. केवळ 13 तासांमध्ये घडलेल्या या घटनेने 3 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT