Beed Shocking Crime Saam Tv news
महाराष्ट्र

कुख्यात गुन्हेगाराची हॉटेलमध्ये हत्या, सपासप वार करत घेतला जीव, बीडमधील रक्तरंजित थरार कॅमेऱ्यात कैद

Beed Shocking Crime: अंबाजोगाईत दरबार हॉटेलमध्ये अविनाश देवकर याची निर्घृण हत्या. अज्ञात आरोपीनं तीक्ष्ण हत्यारानं वार करत जागीच ठार मारलं. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून आरोपीला ताब्यात घेतलं.

Bhagyashree Kamble

  • अंबाजोगाईत दरबार हॉटेलमध्ये अविनाश देवकर याची निर्घृण हत्या.

  • अज्ञात आरोपीनं तीक्ष्ण हत्यारानं वार करत जागीच ठार मारलं.

  • पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून आरोपीला ताब्यात घेतलं.

  • घटनेनंतर परिसरात खळबळ, पुढील तपास सुरू.

बीडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच आणखी एका घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई शहरातील दरबार हॉटेलमध्ये एका क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या तरूणावर तीक्ष्ण हत्यानं वार करत संपवलं. या हल्ल्यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

अविनाश शंकर देवकर (वय वर्ष ३५) असे मृत तरूणाचे नाव आहे. हा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहरातील रायगनगर येथे घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल दरबारमध्ये अविनाश बसला होता. दरम्यान, अज्ञात आरोपी अविनाशजवळ पोहोचला. आरोपीनं तीक्ष्ण हत्यारानं त्याच्या डोक्यात सपासप वार केले. या हल्ल्यात अविनाश रक्तबंबाळ झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, ही हत्या कुणी केली? हत्या कोणत्या कारणास्तव केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी अविनाशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात नेले असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळावरील पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीला शोधलं. पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतलं. पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT