Minor Girl From Beed Forced Into Marriage Saam
महाराष्ट्र

सातवीतल्या पोरीचं लग्न लावलं, नंतर जावयासोबत ठेवले अनैतिक संबंध, दोघांनी मिळून...बीडमध्ये चाललंय काय?

Minor Girl From Beed Forced Into Marriage: आईनं सातवीतील मुलीचं लग्न लावून दिलं. आईचं जावयासोबत अनैतिक संबंध उघड. मुलीला मानसिक त्रास.

Bhagyashree Kamble

  • अल्पवयीन मुलीचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं.

  • आई अन् जावयाचे अनैतिक संबंध.

  • आई अन् नवऱ्याकडून मानसिक त्रास.

बीडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच धारूर तालुक्यातील एका घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर आईनं जावयासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलगी सातवीच्या वर्गात शिकत होती. तिच्या मनाविरूद्ध लग्न लावून दिलं. नंतर आईनं केलेला हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी दोन लहान बहिणी आणि आईसोबत बीडच्या धारूर तालुक्यातील गावात वास्तव्यास आहे. २०१६ साली त्यांचे वडील घर सोडून गेले होते. २०१७ साली इयत्ता सातवीत शिकत असलेल्या मुलीचे लग्न झाले. मुलीच्या आईनं गावातीलच एका तरूणासोबत तिचे लग्न लावून दिले. गावातीलच एका मंदिरात तिच्या आईनं मुलीचे लग्न लावून दिले.

या लग्नाला मुलीचा विरोध होता. मात्र, तरीही जबरदस्तीनं मनाविरूद्ध लग्न लावून दिलं. इच्छा नसतानाही आई, मावशी, चुलत दीर, सासू, चुलत सासरा आणि चुलत सासूनं लग्न लावून दिल्याची तक्रार पीडितेनं पोलीस ठाण्यात केली. नंतर तिला सासरी नांदायला पाठवले. पतीनं इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले.

यानंतर आई आणि सासूला याची माहिती दिली. मात्र, त्यांनी बळजबरी केली. नंतर मुलीसमोर धक्कादायक बाब समोर आली. तिनं आई आणि नवऱ्याचे अनैतिक संबंध पाहिले. यामुळे तिला मानसिक धक्का बसला. मात्र, यानंतर नवऱ्यानं आणि तिच्या आईनं अल्पवयीन मुलीला त्रास देण्याल सुरूवात केली. 'तू आम्हाला बदनाम करतेयस', असं म्हणत दोघांनी मिळून मुलीला मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली.

यानंतर २०२२ साली अल्पवयीन मुलगी आजी आजोबांकडे गेली. तरीही आई आणि नवऱ्याचा त्रास सुरू होता. तिनं अखेर १७ एप्रिल २०२२ साली मानवलोक सेवाभावी संस्थेत जात हकीकत सांगितली. १८ एप्रिल २०२२ रोजी अश्विनी जगताप यांनी तिला बाल कल्याण समितीत हजर केले.समितीच्या आदेशानुसार, तिला सावित्रीबाई फुले मुलींच्या बालगृहात पाठवण्यात आले.

या प्रकरणात चार वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT